पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील राजकीय संबंधावर नेहमीच चर्चा होत असते. मोदी पवारांचं तोंडभरुन कौतुक करतात. तर राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर कायम भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा गेली तीन वर्ष सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी होणार अशाही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. तशा बातम्याही काही वर्तमान पत्रातून आल्या आहेत.
याच मुद्यावर आज शरद पवारांना पुण्यात पत्रकारांनी छेडलं. त्यावेळी पवार म्हणाले, कोणी कोणाचं बोट धरलं म्हणजे लगेच त्याच्या मागे जायचं नसंत. कोणी कोणाचं बोट धरुन जात नाही असंही पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण पवारांचे बोट धरुन राजकारण करत आलो असं वक्तव्य केलं होतं. हलक्या फुलक्या पद्धतीनं शरद पवारांनी ही चर्चा चुकीचं असल्याचं सांगत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार नाहीत असेच संकेत दिलेत.
COMMENTS