ठाणे – मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास वीज पडली. वीज पडली तेंव्हा कार्यालयात कुणीच नव्हते त्यामुळे जीवीतहानी झाली नाही. कार्यालयाबाहेर असलेल्या विद्युत उपकरणांचे नुकसान यामुळे झाले. वीज पडली तेंव्हा तिथून एक महिला जात होती. वीज पाहून तिला तिथेच चक्कर आली. तर एक लहान मुलगाही घाबरुन पडला. आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयावरच वीज पडल्याचं लक्षात येतात तिथे भाजप कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी धाव घेतली. वादळी वारे आणि पावसामुळे मुरबाडमध्ये मोठे नुकसानही झाले आहे.
COMMENTS