भाजप आमदाराच्या वर्तणुकीमुळे महिला आयपीएस अधिकाऱ्याचे अश्रू अनावर

भाजप आमदाराच्या वर्तणुकीमुळे महिला आयपीएस अधिकाऱ्याचे अश्रू अनावर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्ये, भाजप आमदारानेच एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन करत बाचाबाची केली असल्याचे प्रकरण उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे उत्तरप्रदेशमध्ये लेडी सिंघम म्हणून परिचीत असलेल्या आयपीएस चारु निगम यांना आमदारांच्या या असभ्य वर्तनामुळे भर रस्त्यात अश्रू अनावर झाले.
गोरखपूरमध्ये दारु गुत्ते आणि कच्च्या दारुविरोधात रास्तारोको करण्यासाठी महिला रस्त्यावर उरलेल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचवेळी हा रास्ता रोको हटवण्यासाठी आयपीएस अधिकारी चारु निगम फौजफाट्यासह दाखल झाल्या. त्यांनी हा जाम हटवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी आंदोलक महिलांनी पोलिसांवरच लाठ्यांनी हल्ला चढवला. यात चारू निमग जखमीही झाल्या. पण या महिलांची बाजू घेत भाजप आमदार राधामोहन दास घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी थेट आयपीएस अधिकारी चारु निगम यांनाच अपमानास्पद वागणूक दिली.

आमदारांच्या या वर्तनाने चारु निगम खचल्या आणि त्यांना रडू कोसळले. आमदारांच्या या वर्तनावर मात्र चहू बाजूने टीका होत आहे.

 

COMMENTS