भाजप उपाध्यक्षासह कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला

भाजप उपाध्यक्षासह कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला

कल्याण – कल्याणामध्ये भाजप शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.
काल (शनिवारी)  रात्री 11 ते 12 च्या दरम्यान 10-12 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांसह शत्रुघ्न भोईर यांच्या घरावर हल्ला केल्याची माहिती शत्रुघ्न भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिली. या हल्ल्यात शत्रुघ्न भोईर, त्यांची पत्नी, बहिणी, भाऊ असे कुटुंबिय जखमी झाले.

 

भाजप शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर, त्यांचे बंधू भरत भोईर आणि भगिनी सुनीता भंडारी यांच्यावर खडकपाडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

 

COMMENTS