अभिनेत्री रविना टंडनला राजकारणात प्रवेशाची कोणी दिली होती ऑफर ?

अभिनेत्री रविना टंडनला राजकारणात प्रवेशाची कोणी दिली होती ऑफर ?

बॉलिवूडची सुंदरी रविना टंडन तिच्या ट्विटमुळे सतत चर्चेत असते. तिच्या एका नव्या ट्विटमुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे. तिनं तिच्या ट्विटर अकाऊंटवर तिचे साडीतले फोटो अपलोड केले आहेत. त्यावर तिच्या चाहत्यांनी तू साडीत सुंदर दिसते म्हणत तिचं कौतुक केलं तर काही चाहत्यांनी तु असे फोटो अपलोड करुन राजकारण करत आहेत असं म्हटलं. त्यामुळे रविना त्या चाहत्यांवर चांगलीच संतापली. तिने ट्विट करुन त्या चाहत्यांवर निशाणा साधला. मी साडी घातली तर तुम्ही मला राजकारणी म्हणाल, मला हिंदुत्वावादी म्हणला, मला संघीष्ट म्हणाल, मला भक्त म्हणाल. मात्र अशा टीकांना मी घाबरत नाही. मला साडी घालायला आवडते आणि त्यामुळे मी साडी घालते. कोणी काहीही टिका करो, मी त्याची फिकीर करत नाही. मला राजकारणात अजिबात रस नाही. त्यामळे मी कधीच राजकारणात प्रवेश करणार नाही. या आधीच मला काँग्रेस, भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसकडून पक्षप्रवेशाची ऑफर होती. परंतु मी ती नम्रपणे धुडकावून लावली. कारण राजकारण हा माझा पिंड नाही.

COMMENTS