भाजप खासदाराने दिला भाजपमुक्त भारताचा नारा,  व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल !

भाजप खासदाराने दिला भाजपमुक्त भारताचा नारा,  व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल !

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. भारतातून काँग्रेसला हद्दपार करायचं आहे असं दोन्ही नेते सांगत असतं. आता मात्र भाजपचाच खासदार भाजपमुक्त भारताचा नारा देतोय. अमित शहांच्या या भारतमुक्त अभियानाला आमची साथ आहे असंही तो खासदार सागंतोय.

राजस्थानमधील भाजपचे उदयपुरचे खासदार अर्जुन लाल मीणा यांनी उदयपूरमध्ये एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे भाजपमुक्त भारताचे अभियान चालवत आहेत. आणि आम्ही सगळे या अभियानात त्यांना साथ देत आहोत असंही मीणा म्हणाले. हे सर्व सांगितल्यानंतर आपण काहीतरी चुकीचं बोललो हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भाजपमुक्त नाही तर काँग्रेसमुक्त म्हणायचं आहे अशी सारवा सारव त्यांनी केली. मात्र मीणा यांचं हे वक्तव्य राजस्थानमध्ये सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

COMMENTS