मुंबई – विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी येथील भाजप जवळकीवर उद्या काँग्रेस नेत्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्याच्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष नेत्यांनीच सत्ताधारीच कौतुक करण्याच्या भूमिकेवर विखेंची भूमिका काय हे विचारले जाणार असल्याची शक्याता आहे असे सूत्रांनी सांगितले.
कालच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. विखे पाटील यांनाच भूमिका विचाराव असे मत मांडले होते. उद्या दुपारी राज्यातील काॅग्रेस वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे, यात राज्यातील सध्याची राजकीय घडामोडी, पावसाळी अधिवेशन या अनुशगांने चर्चा केली जाणार आहे.
विखे यांची माझी भेट झाली नाही. उद्या काँग्रेस बैठकीत विखे यांना विचारना केली जाईल असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे
COMMENTS