भाजप नगराध्यक्षांना लाचप्रकरणी पतीसह अटक

भाजप नगराध्यक्षांना लाचप्रकरणी पतीसह अटक

सातारा – भाजपच्या वाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना लाच घेतना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून लाच घेताना नगराध्यक्षा डॉ प्रतिभा शिंदे यांच्यासह त्यांच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे.

नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी ठेकेदाराला शौचालय बांधणीचा उर्वरित 8 लाखाचा चेक देण्यासाठी 14000 रुपयाची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

यंदा प्रतिभा शिंदे यांची  नगराध्यक्षांची निवड झाली होती. मात्र लोकनियुक्त नगराध्यक्षांनीही लाच घेऊन, पद आणि प्रतिष्ठेला काळिमा फासला आहे. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना अवघ्या एका मताने भाजपाच्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या. या घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

 

COMMENTS