मुंबई – आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातील खांदेपालटावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली. सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार आहे. मात्र विरोधकांनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
COMMENTS