भाजप सरकारविरोधात माध्यमे गप्प का ? राज ठाकरे यांचा सवाल

भाजप सरकारविरोधात माध्यमे गप्प का ? राज ठाकरे यांचा सवाल

मुंबई – भाजप सरकार हे केवळ जाहीरात बाजीवर सुरू आहे. कोणतेही काम न करता केवळ जाहीरातबाजी करुन प्रसिद्धी मिळवण्याचा काम भाजपचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करत आहे. व्यापारी, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे. तरीही त्याच्या बातम्या माध्यमातून हव्या त्या प्रकारे येत नाहीत. गुजरातमध्ये जीएसटीविरोधात व्यापा-यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्याच्या बातम्या माध्यमातून  येत नाहीत असा आरोप राज ठाकरे यांनी केला. आणीबाणीच्या काळात लेखक, पत्रकार त्यावेळच्या सरकारविरोधात आवाज उठवत होते. आता मात्र सरकारविरोधात मोठा रोष असतानाही माध्यमे आणि लेखक गप्प का असा सवाल त्यांनी केला.

हिंदीच्या सक्तीवरुन त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदी ही काही वाईट भाषा नाही. कोणतीही भाषा वाईट नसते, पण हिंदी राष्ट्रभाषा नसताना तिची सक्ती का केली जात आहे असा सवाल त्यांनी केला.  एबीपी माझ्याच्या एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.

COMMENTS