भारतातील तब्बल 35 टक्के महिलांना दुसरं मुल नको आहे. मदर्स डे च्या निमित्ताने असोचामने केलेल्या सर्व्हेमध्ये ही माहिती पुढे आली आहे. देशभरातील मोठ्या 10 शहरामधील 1500 सँपल घेऊन हा सर्व्हे करण्यात आला आहे. दुसरं मुल नको असण्याची विविध कारणे या महिलांनी सांगितली आहेत. नोकरी करणा-या या महिल्या असल्याचंही पुढं आलं आहे. अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लखनऊ आणि मुंबईतील महिलांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते.
दुसरं मुल नको असण्याची काय आहेत कारणे ?
दुसऱ्या मुलासाठी वेळ देता नाही.
कुटुंबातील ताणतणाव
कामाच्या ठिकाणचा वाढता तणाव,
मुलांचं पालणपोषण करण्याचा वाढता खर्च
दुसऱ्या बाळंतपणासाठी घेतलेल्या रजेमुळे आपल्या पदोन्नतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जोखीम नको
काहींना एकाच मुलावर लक्ष केंद्रीत करता यावं म्हणून दुसरे मुल नको आहे
COMMENTS