शेतक-यांना दिलासा देणारी बातमी आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा फारसा परिणाम होणार नाही असं भारतीय हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. अगदी जुलैच्या अखेरीस अल निनो सक्रीय होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचाही मान्यूवर विपरीत परिणाम होईलच असं नाही असंही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आलंय. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक के.जे. रमेश यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे देशभरातील शेतक-यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळालाय. काही दिवसांपूर्वी २०१४ व २०१५ नंतर ‘अल निनो’ परत येणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने दिला होता. ‘अल निनो’ परत आल्यास यंदाच्या वर्षी पाऊस कमी होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतातूर झाले होते. त्यापार्श्वभूमीवर या बातमीमुळे शेतकरी बांधवांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
COMMENTS