भारनियमनामुळे राज्यातील कृषी वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.कृषी पंपांना रात्री दहा ऐवजी आठ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
वीजेची कमी उपलब्धता असल्याने सध्या कृषी पंपांना दिवसा आठ आणि रात्री आठ अशा दोन टप्प्यात चक्रकार पद्धतीने वीज पुरवठा केला जात आहे. राज्यात कृषी पंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे. अशा वाहिन्यांवर सद्य परिस्थितीत दिवसा 8 तास व रात्री 8 तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पध्दतीने रात्री 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यन्त अखंडित वीजपुवठा करण्यात येत आहे. वीजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषिपंपांना दिवसा 8 तास व रात्री 10 तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.
COMMENTS