भारिप-बमसं रिसोड शहरच्यावतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

भारिप-बमसं रिसोड शहरच्यावतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

भारिप-बमसं रिसोड शहरच्यावतीने युवा नेतृत्व तथा समाजसेवक प्रदीपभाऊ खंडारे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अण्णाभाऊ साठेंना आयुष्यात आलेल्या कटू अनुभव जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष त्यांनी शब्दबद्ध करून सामाजिक व आर्थिक स्थितीचे बसलेले चटके व त्यातूनही त्यांनी परिस्थितीवर केलेली मात ही आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. दीड दिवस शाळा शिकलेल्या या महापुरुषाने आयुष्याच्या शाळेत जे शिकले ते अनुभव जगाला वैचारिक संपदा म्हणून दिले जगातील विविध 27 भाषांमध्ये भाषांतरे होऊन सामाजिक जाणिव निर्माण करणारे साहित्य निर्माण केले असे मत खंडारे यांनी व्यक्त केले.

प्रसंगी प्रदिपभाऊ खंडारेसह ,राँकी जूमडे,अविनाश पंडीत,गोपाल फूके,आकम खान,लखन मामा जूमडे,राम चराटे,श्याम राऊत,रितेश गोखले,रोहीत कांबळे,रवि जूमडे,विकास मोरे इत्यादी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS