भिवंडी – मालेगाव महापालिकेतील शिवसेना-काँग्रेस युतीची पुनरावृत्ती पुन्हा भिवंडी महापालिकेत झाल्याचे पाहायला मिळाले. भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसचे जावेद दळवी यांची निवड झाली. तर शिवसेनेचे मनोज काटेकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.
या निवडणुकीत जावेद दळवी यांनी भाजप उमेदवार प्रकाश तावरे यांचा पराभव केला. जावेद दळवी यांना 90 पैकी तब्बल62 मते मिळाली. तर तावरे यांना केवळ 28 मतावर समाधान मानावे लागले. जावेद दळवी हे दुसऱ्यांदा महापौरपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसने पहिल्यांदाच बहुमताने सत्ता स्थापन केली आहे.
महापौर निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना अशी अजब युती पाहायला मिळाल्याने राजकीय समीकरणे बदलत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शिवसेनेचे मनोज काटेकर यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या शाईन यांचा त्यांनी पराभव केला.
भिवंडी महापालिकेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस- 47
भाजप- 19
शिवसेना – 12
कोणार्क- 4
आरपीआय- 4
समाजवादी- 2
राष्ट्रवादी- 0
अपक्ष – 2
COMMENTS