“भीम अॅप” शिकवा, पैसे कमवा; पंतप्रधान मोदींची ऑफर

“भीम अॅप” शिकवा, पैसे कमवा; पंतप्रधान मोदींची ऑफर

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज (दि. १४) नागपुरात तरूणांना आगळीवेगळी ‘ऑफर’ दिली आहे. ‘मोबाइल उचला, भीम अॅप शिका, ते अधिकाधिक लोकांना शिकवा आणि पैसे कमवा’, अशी साद घालत त्यांनी भावी पिढीला आपल्या मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न केला.

भीम अॅपमध्ये ‘रेफरल’ असा एक पर्याय आहे. तो वापरून तुम्ही जर एखाद्याला भीम अॅप वापरण्याची शिफारस केलीत, त्याला ते वापरायला शिकवलेत आणि त्यानंतर त्याने जर त्यावरून तीन व्यवहार केले, तर तुमच्या खात्यात दहा रूपये जमा होतील. एका दिवसाला तुम्ही 20 लोकांना भीम अॅपशी जोडलेत तर तुम्हाला 200रूपये मिळतील. एखाद्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानात जर भीम अॅपवरून व्यवहार सुरू केले, तर त्यालाही ठराविक व्यवहारानंतर 25 रूपये मिळतील, असेही त्यांनी जाहीर केले. ही योजना 14 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

 

COMMENTS