नाशिक – नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातलं वैर अख्या कोकणाला माहित आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पक्षप्रवेशाच्या चर्चेवरुन दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा राणेंवर टीका केली आहे.
नारायण राणे यांनी आजपर्यंत पैशाच्या जोरावर राजकारण केलं. नारायण राणेंकडील पैसा समजल्यावर त्यांना भाजपवाले प्रवेश देतील की नाही याबाबत साशंकता आहे. भ्रष्टाचारमुक्त भाराताचं स्वप्न पाहणारे भाजपचे नेते त्यांना प्रवेश देतात का ते पहावं लागेल. अर्थात त्याचा योग्य तो निर्णय भाजप घेईल असंही केसरकर म्हणाले. अशा नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळत असेल तर तो भाजपचा प्रश्न आहे असं सांगत भाजपवरही अप्रत्यक्ष टीका केली.
COMMENTS