मंत्रिगट – शेतकरी प्रतिनिधी बैठक, सह्याद्रीवर अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त !

मंत्रिगट – शेतकरी प्रतिनिधी बैठक, सह्याद्रीवर अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त !

मुंबई – शेतक-यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकराने नेमलेला मंत्रिगट आणि शेतक-यांच्या सुकाणू समितीचे प्रतिनिधी यांच्यात आज सह्याद्री गेस्ट हाऊसवर थोड्याच वेळात बैठक सुरू होत आहे. मंत्रिगटामध्ये चंद्रकांत दादा पाटील, सुभाष देशमुख, पांडुरंग फुंडकर, गिरीष महाजन आणि दिवाकर रावते यांचा समावेश आहे. तर सुकाणू समितीच्या प्रतिनिधींमध्ये राजु शेट्टी, बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश आहे. सरकारशी चर्चा करयाची की नाही यावरुन सुकाणू समितीमध्ये पडलेली फूट आणि शेतक-यांच्या 90 टक्के मागण्या मान्य केल्याचं चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य या पार्श्वभूमीवर या बैठकीतून काय तोडगा निघतो ते पहावं लागेल. फक्त अल्पभूधारकांनाच कर्जमाफी देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे तर सरसकट कर्जमाफीची सूकाणू समितीची मागणी आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडं राज्यातील शेतक-यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री गेस्ट हाऊसवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

COMMENTS