मुंबई – आज राज्य मंत्रिमंडळाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ते खालील प्रमाणे…
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व अनुषंगिक कामांसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भूधारकांना नुकसान भरपाई देण्याबरोबरच या प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या बांधकामधारकांना पुनर्वसन व पुन:स्थापनेचे लाभ देण्याबाबत निर्णय.
- कोकण रेल्वे महामंडळाच्या वाढीव अधिकृत भागभांडवलामधील शासनाच्या समभागाच्या प्रमाणामध्ये अतिरिक्त 702 कोटी 57 लाख 76 हजार रुपयांचे समभाग टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास मंजुरी.
- बाजारसमित्यांवरील प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळास मुदतवाढ देण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता.
- मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे नामकरण मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पब्लिक पॉलिसी असे करून 2017-18 वर्षापासून पुढील पाच वर्षात 25 कोटी निधी देण्याचा निर्णय.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील सरळसेवेने भरावयाची सहयोगी प्राध्यापक तसेच प्राध्यापक संवर्गातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळण्याचा निर्णय.
- जर्मन डेव्हलपमेंट बँकेडून (KFW) 12 मिलियन युरो (146.8 कोटी रुपये) कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाचे हमी प्रमाणपत्र (confirmation Certificate) देण्यास मान्यता.
- महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या डॉफिन एएस 365 एन 3 व्हीटी-एमजीके या हेलिकॉप्टर संदर्भातील निर्णय.
COMMENTS