राजु शेट्टी
उद्याचे आंदोलन स्थगित, मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास 23 जूनपासून पुन्हा आंदोलन छेडणार
स्मानीनाथ आयोगाचे शिफारशी लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांना भेटणार
आजपासूनच अल्पभूधारक शेतक-यांचे कर्जमाफी, आजपासून मिळणार नवीन कर्ज
सरसकट कर्जमाफीच्या चर्चेसाठी आमचेही ( सूकाणू समिती) प्रतिनिधी असणार
……………………………………………………
चंद्रकांत पाटील
संपूर्ण कर्जमाफी
दोन दिवसात दुधाचे दर वाढवणार
शेतक-यांवरील गुन्हे मागे घेणार
मुंबई – सह्याद्री गेस्टहाऊसवर शेतकरी सूकाणू समिती आणि राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिगट यांच्यातली बैठक संपली आहे. बैठक सकारात्मक झाल्याचं सांगण्यात येतंय. या बैठकीत सरकारनं संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिले आहे. दोन दिवसात दूधाचे दर वाववले जाणार आहेत. तसंच संपादरम्यान शेतक-यांवर दाखल झालेले गुन्हेही मागे घेण्यात येणार आहेत. सराकरनं ही आश्वासनं पाळली नाहीत तर पुन्हा 23 जूनपासून आंदोलनाचं हत्यार वापरलं जाणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिलीय. थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील माहिती अधिकृतपणे दिली जाणार आहे.
COMMENTS