मंत्री जानकरांनी एकट्याने केला लोकल ट्रेनने प्रवास !

मंत्री जानकरांनी एकट्याने केला लोकल ट्रेनने प्रवास !

मुंबई – राज्याचा एखादा कॅबिनेट मंत्री एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी कुठेही जायचा असला की त्याच्यासोबत गाड्यांचा ताफा आणि सुरक्षेचा सर्व बंदोबस्त असतोच असतो… लाल दिवा बंद झाला असला तरी त्यांची व्हिआयपी ट्रिटमेंट काही बंद झालेली नाही. मात्र एखादा मंत्री कुठल्याही लवाजम्यासह तुमच्या आमच्या सारखा ट्रेन ने प्रवास करत असेल तर…. काल दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सर्वसामान्य मुंबईकरांसारखा एकट्याने लोकलचा प्रवास केला. त्यांना चर्चगेटहून पश्चिम उपनगरात एका मिटिंगसाठी जायचं होतं. मात्र ट्रॉफिक जॅम, रस्त्याचे खड्डे हे टाळण्यासाठी त्यांनी थेट लोकलची मदत घेतली. स्टेशनमध्ये येऊन त्यांनी तिकट काढलं आणि एकटेच डब्यात चढले. एवढच नाही तर मुंबईकसांरखे डब्याच्या दरवाज्यात उभेही राहिले. कुणीतरी मंत्रीमहोदयांना ओळखले. लगेच फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरलही केले.

COMMENTS