मीरा भाईंदर – दोनच दिवसांपूर्वी शिव वाहतूक सेनेच्या मेळाव्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या थेट व्यासपीठावरुन तोफ डागणारे हाजी अराफत शेख हे मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभेत सहभागी झाले. एवढच नाही तर शेख यांना उद्धव ठाकरे बसलेलल्या पहिल्या फळीच्या रांगेत स्थान दिले गेले. तसेच त्यांना भाषणाची संधीही दिली गेली. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क सुरू झालेत.
रावते यांनी तीन वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळात रिक्षा स्टँड तरी उभा केला का ? अशा शब्दात हाजी अराफत यांनी तोफ डागली होती. ज्येष्ठ मंत्र्यांच्या विरोधात एवढी टोकाची भूमिका घेतली असताना आणि आपल्याच मंत्र्यांच्या कामगिरीचे वाभाडे काढले असताना हाजी अराफत यांना पक्ष नेतृत्वाने दोनच दिवसात मानाचे स्थान कसे काय दिले ? असा प्रश्न विचारु जाऊ लागला आहे. पक्षनेतृत्वाला अराफत यांचे आरोप मान्य आहेत का ? की रावतेंच्या विरोधात बोलण्यासाठी हाजी अराफत यांना पक्षातूनच कोणी फूस दिली होती का ? या सारख्या प्रश्नांची कुजबुज शिवसैनिकांमध्ये आहे.
COMMENTS