सर्वाधिक जागा जिंकूनही मणिपूरमध्ये सत्तेपासून दूर रहावे लागलेल्या काँग्रेसमधून आणखी चार आमदार फुटले आहेत. चारही आमदार भाजपच्या गोटात सामिल झाले आहेत. मणिपुरमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 60 पैकी सर्वाधिक 28 जागा काँग्रेसला मिळल्या होत्या. तर भाजपला फक्त 21 जागा मिळाल्या होत्या. बहुमतापासून फक्त 3 जागा दूर असतानाही काँग्रेसला सत्ता स्थापन्यात यश आलं नव्हतं. भाजपनं उर्वरित सर्व आमदारांची मोट बांधून सत्ता हस्तगत केली होती. त्यावेळी काँग्रेसच्या दोन आमदारांनीही भाजपच्या भाजुनं मतदान केलं होतं. त्यानंतर आता आणखी चार आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळं काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणा-या आमदारांची संख्या सहा झाली आहे. या सर्व आमदारांवर पक्ष बदलल्यामुळे कारवाई होऊ शकते.
COMMENTS