मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. राज्यपाल आज (बुधवारी) दुपारी एन. बिरेन सिंग यांना राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. भाजपाला नागा पीपल्स फ्रंटने (एनपीएफ) पाठिंबा दिल्याने मणिपूरमध्ये प्रथमच भाजपाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले आहे.
मंगळवारी रालोआचा घटक पक्ष असणाऱ्या एनपीएफच्या 4 आमदारांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. तर या आधी एनपीएफपूर्वी नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) चार आमदारांनीही भाजपाला पाठिंबा घोषित केला होता. त्यामुळे भाजप 60 सदस्यीय मणिपूर विधानसभेत 32 सदस्यांचा पाठिंबा असल्याचे सांगून सत्ता स्थापनेचा दावा केला. त्या पार्श्वभूमीवर भाजपा शिष्टमंडळाने रविवारी 28 आमदारांसह राज्यपालांची भेट घेतली होती.
COMMENTS