मनसे कार्यकर्त्यांची परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण

मनसे कार्यकर्त्यांची परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण

ठाणे – ठाण्यात कोलबाड येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण केली आहे. कोळी समाज आणि मराठी माणसालाच या ठिकाणी मासे विकण्याचा हक्क असल्याचे सांगत मनसेने हे आंदोलन केले आहे.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी भूमिपुत्रांचा मुद्दा ठळकपणे मांडला होता. पदपथावर बसून व्यवसाय करण्याचा हक्क हा मराठी माणसाचाच असल्याचा दावा त्यांनी केला होता. तोच धागा पकडून, ठाण्यातील मनसैनिकांनी आज कोलबाड इथे परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण करत हाकलून लावलंय.

 

COMMENTS