“मनी लॉंडरींग प्रकरणात आशिष शेलारांना मुख्यमंत्र्यांचं संरक्षण”

“मनी लॉंडरींग प्रकरणात आशिष शेलारांना मुख्यमंत्र्यांचं संरक्षण”

मनी लॉंडरिंग प्रकरणात छगन भुजबळ हे तुरुंगात आहेत, काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची चौकशी सुरू आहे. मग भाजप नेते आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर तसेच आरोप असताना त्यांची चौकशी का होत नाही ? असा सवाल आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती मेनन शर्मा यांनी केलाय. छगन भुजबळंचा पार्टनर असलेले महेश बालदी हे आशिष शेलार यांचेही पार्टनर आहेत. मग भुजबळ तुरुंगात असताना शेलार मोकाट कसे असा सवार प्रीती शर्मा-मेनन यांनी केलाय. शेलार यांच्यावर कारवाई न होण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महेश बालदी आणि आशिष शेलार यांनी ज्या कंपन्या स्थापन केल्या आहेत, त्यात काही काम होत नाही, फक्त मनी लॉंडरींग होत आहे. त्याविरोधात तक्रारी केल्या मात्र सरकारी यंत्रणा त्यास सहकार्य करत नाही. मुख्यमंत्री त्यांच्यावर दबाव आणत असल्याचाही आरोप आम आदमी पार्टीनं केलाय आहे.

माझ्यावरील आरोप म्‍हणजे शिळया कढीला उत – आशिष शेलार

दरम्यान आम आदमी पार्टीचे आरोप आशिष शेलार यांनी फेटाळून लावले आहेत. हे आरोप  खोटे असून राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे.    सर्वेश्‍वर आणि रिध्‍दी या दोन कंपन्‍यांच्‍या नावे माझ्यावर आरोप करण्‍यात आले असले तरी माझा आता या कंपन्‍यांशी कोणताही संबंध नाही. मी राजिनामा दिल्‍याचे  व अन्‍य कागदपत्र संबंधित यंत्रणेला सादर केली आहेत.  अन्‍य कपंन्यांची व व्‍यक्‍तींची जी नावे माझ्याशी जोडली जात आहेत ती खोडसाळपणे जोडली जात आहेत.    माझी कुणाशीही पार्टनशिप नाही. तसचे मी कुठल्‍याही कंपनीत संचालक मंडळावर नाही. त्‍यामुळे त्‍या कंपन्‍यांमधील अन्‍य कोणा व्‍यक्‍तीचे अन्‍य कुणाशी असलेल्‍या व्‍यवहाराशी माझा संबध नाही आणि मला त्‍यांची कल्‍पना नाही.   छगन भूजबळ यांची जी चौकशी सुरू आहे. त्‍याच्‍याशी संबंधित कंपन्‍या, व्‍यक्‍तीशी माझा प्रत्‍यक्ष वा अप्रत्‍यक्ष कोणताही संबंध नाही. त्‍यामुळे हे आरोप माझी बदनामी करणारे आहेत.

COMMENTS