अलीगढ– भाजपमध्ये वाचाळवीर नेत्यांची काही कमी नाही. आता त्याच्यात आणखी एक भर पडली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा शिरच्छेद करणा-याला 11 लाख रुपयांचे इनाम देऊ अशी धमकी भाजप युवा मोर्चाचे उत्तर प्रदेशातील नेते योगेश वार्ष्णेय यांनी दिलीय. पश्चिम बंगालमध्ये काल भाजप युवा मोर्चाच्या कार्यक्रमात लाठीचार्ज झाला होता. त्यावर योगेश यांनी ही धमकी दिली आहे. ममता बॅनर्जी कधीच सरस्वती पुजा, राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या यात्रांना परवानगी देत नाहीत. याऊलट इफ्तार पार्टीचे आयोजन करतात आणि नेहमी मुस्लिमांना पाठिंबा देतात असा आरोप त्याने केला. पश्चिम बंगालमध्ये हनुमान जयंतीवरुन वाद निर्माण झाला होता. सुरी पोलिसांनी हनुमान जयंतीनिमित्त यात्रा काढणाऱ्या संस्थेला परवानगी नाकारली होती. तसेच हनुमान जयंतीला यात्रेदरम्यान पोलिसांनी लाठीमारही केला होता.
Newer Post
योगींचे बाण, फडणवीसांना ताण !
COMMENTS