नवी दिल्ली – तृणमूल काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते आणि खासदार मुकुल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांनी माध्यमांसमोर याची औपचारिक घोषणा केली. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसादही उपस्थित होते.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर रॉय हे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जात होते. भाजपच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे, की तृणमूल काँग्रेसचे माजी नेते मुकुल रॉय नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये सामिल होऊ शकतात.
गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी व मुकुल रॉय यांच्यामध्ये बेबनाव आणि वितुष्ट आले होते. ममतांनी रॉय यांना पदावरुन हटवून त्यांच्याजागी राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांची नेमणूक केली होती. उल्लेखीनीय म्हणजे रॉय यांना ममता बॅनर्जीचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. मुकुल रॉय यांचा भाजप प्रवेश हा ममता बनर्जीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Today I have Joined BJP and it's my proud privilege to work under PM Modi: Mukul Roy,Former TMC leader pic.twitter.com/i9kYwETKSw
— ANI (@ANI) November 3, 2017
COMMENTS