30 मे ला मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा मुंबईतील आझाद मैदान ते मंत्रालय अशा धडक मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाला मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठिंबा घोषित केला असून मोर्चानंतरही मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला नाही, तर बेमुदत उपोषणात डबेवालेही सामील होणार आहेत.
‘मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे धडक मोर्चा व बेमुदत उपोषणाची हाक दिलेली आहे. त्याला प्रतिसाद देत डबेवाल्यांनी मोर्चामध्ये सामील झाल्यानंतर एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे’. असे मुंबई डबेवाले असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.
‘मुंबईचे डबेवाले हे मावळ मराठा असून आरक्षणाच्या सुविधेअभावी डबेवाल्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या सर्व प्रामाणिक आंदोलनांत मुंबईचे डबेवाले आघाडीवर असतील. डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून माझ्यासह अर्जुन सावंत, दशरथ केदारी, विठ्ठल सावंत, रामदास करवंदे, रोहिदास सावंत हे एक दिवसीय उपोषण करतील’ असे तळेकर म्हणाले.
COMMENTS