मराठा क्रांती मोर्चासंदर्भात नितेश राणेंचं महापालिका आयुक्तांना पत्र !

मराठा क्रांती मोर्चासंदर्भात नितेश राणेंचं महापालिका आयुक्तांना पत्र !

मुंबई – 2 ऑगस्ट – मराठा क्रांती मूक मोर्चात सहभाग घेण्यासाठी मराठा आमदार सरसावले असतानाच आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहले आहे. मराठा क्रांती मोर्चासाठी सर्व सोई सुविधा पुरवा, मी त्याचा खर्च करेन असं त्यांनी पत्रात म्हटलंय आहे. नेमकं पत्रात काय म्हटलंय ते पाहू,

“मराठा क्रांती मूक मोर्चाचे येत्या बुधवारी 9 आँगस्ट रोजी मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. जिजामाता उद्याने ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग असून या मोर्चात राज्यातील 70 ते 80 लाख समाजबांधव सहभागी होणार आहे. त्या मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाेकरांसाठी पिण्याचे पाण्याची तसेच फिरत्या शौच्छालयाची व्यवस्था करण्यात यावी, या सोयी सुविधेसाठी लागणारा सर्व खर्च मी महापालिकेला देण्यास तयार आहे.”

COMMENTS