मराठा मोर्च्यात सहभागी झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांना नोटिसा

मराठा मोर्च्यात सहभागी झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांना नोटिसा

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षण मागण्यासाठी मागील वर्षी 16 ऑक्टोबर रोजी ठाण्यात मराठा समाजाचा मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आता ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. असे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे.

या मोर्चात काही सरकारी अधिकारी सहभागी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. यावर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी नोटीस बजावली आहे. कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना संबंधित अधिकाऱ्यांनी आपला सहभाग नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी यांनी या अधिकाऱ्यांना लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे.

याबाबत अश्विनी जोशी म्हणाल्या की,  ठाण्यातील मोर्च्यात काही अधिकारी सहभागी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याशिवाय, एका माहितीच्या अधिकारातंर्गत आलेल्या अर्जात या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती मागवण्यात आली असल्याचे अश्विनी जोशी यांनी सांगितले. मोर्चात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रारीसह छायाचित्रेही देण्यात आले असल्याची माहिती आहे .

COMMENTS