मुख्यमंत्र्यांशी शुक्रवारी झालेल्या बैठकीत किसान क्रांतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शेतक-यांना हा निर्णय मान्य झाला नाही आणि काही वेळातच या संपात फूट पडली. या चर्चेत सहभागी असलेले जयाजी सुर्यवंशी यांच्या कानात मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी काय मंत्र दिला अशी चर्चा सर्वत्र रंगत होती.
आज जयाजी सूर्यवंशी (दि. 4) औरंगाबादेत बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु आज दुपारी उशीरापर्यंत बैठकच झाली नाही. त्यामुळे संतप्त मराठा संघटनाच्या प्रतिनिधींनी कोल्हापुरातील जयाजी सूर्यवंशीच्या घरावर मोर्चा काढून घोषणाबाजी केली. यावेळी जयाजी यांच्या घरावर धडक देत टमाटे, भेंडी, बटाटे फेकून रोष व्यक्त केली.
दरम्यान,’ सोलापुरातील शेतकऱ्यांनी जयाजी सुर्यवंशींचा पुतळा जाळून निषेध केला होता. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणाऱ्या सूर्यवंशी यांच्या भूमिकेबद्दल शेतकरी संशय व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचा उद्रेक बघता जयाजी सूर्यवंशी गायब झाले असल्याचे बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांचा संप फोडण्यासाठी राज्य सरकारने जयाजी सूर्यवंशी यांना निवडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून त्यांच्यावर सर्वत्र टीका होत असल्याचे पाहून सूर्यवंशी यांनी काल आपण संप मागे घेण्याचा निर्णय घाईत घेतला असून आता पश्चाताप होत आहे आशी कबुली दिली होती.
COMMENTS