मुंबई – ‘गैरव्यवहार केल्याचे आरोप माझ्यावर झाले.. माझ्या पीएने लाच घेतल्याचे आरोप झाले.. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप झाले.. या सगळ्याची सरकारने, अँटी करप्शन विभागाने आणि लोकायुक्तांनीही चौकशी केली. पण त्यातून समोर काय आले? शून्य! भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणांमध्ये बोलायचे नाही आणि फक्त ‘एकनाथ खडसे’ हे नाव दिसले, की आरोप करायचे, अशी काहींची भूमिका असते. सुनील तटकरे, अजित पवार यांच्याविरोधातील आरोप दमानिया यांनी मागे घेतले आहेत. तरी मलाच का टार्गेट केले जात आहे, असा सवाल खडसे यांनी यावेळी उपस्थित केला.
अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंच्या विरोधात तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. या आरोपांवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी खडसे म्हणाले, “मी भाषणामध्ये कोणाचेही नाव घेतले नाही. मला कोणत्याही महिलेचा अनादर करायचा नाही. तसे केले नाही. “
“आतापर्यंत माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली आहे. न्यायालयाने नेमलेल्या समितीचा अहवालही सादर होईल. पण माझ्यावर असे निराधार आरोप सतत होत आहेत. भोसरीमध्ये माझ्या जावयाने जागा घेतली, त्याचीही चौकशी झाली. त्यातून काहीही समोर आलेले नाही. त्या जमिनीवर मूळ मालकाचेच नाव आहे. सगळी कागदपत्रे पाहूनच जमीन खरेदी केली आहे. पण तरीही आरोप झाल्यामुळे त्याचीही चौकशी झाली आहे. माझे शेती पलीकडे काहीही उत्पन्न नाही. माझी 100 टक्के बागायती जमीन आहे.1996 पासून नियमित टॅक्स भरतो. 2009 आणि 14 च्या निवडणुकीच्या निमिताने माझी मालमत्ता सर्वापुढे आलीच आहे. माझ्या घरातील चौकशी इन्कम टॅक्स विभागाने वाल्यांनी केल्या आहे. जर काही मालमत्ता जास्त आढळली तर त्र्यंबकेशवरला जाऊन दान देईन, पितृपक्ष सुरू आहे ना… मात्र प्रसिद्धीसाठी आरोप करायचा असतो. सूड भावनेने हे आरोप केले गेले आहेत. आणखी चौकशी व्हाव्यात. खरं काय ते समोर येईल. असे खडसे म्हणाले.
COMMENTS