मला भाजपची ऑफर आहे – नारायण राणे, कालच्या भेटीबाबत मात्र खंडण !

मला भाजपची ऑफर आहे – नारायण राणे, कालच्या भेटीबाबत मात्र खंडण !

मुंबई – भाजप प्रवेशाबाबतचा नारायण राणे यांचा सस्पेन्स कायम आहे. मला भाजपची ऑफर आहे. मात्र याबाबत आज आज कोणताही निर्णय झाला नाही. मी त्यांना होय म्हणूनही सांगितले नाही आणि त्यांना नाही म्हणूनही सांगितले नाही, असं सांगत त्यांनी भाजप प्रवेशाबाबतचा संभ्रम कायम ठेवला आहे. अहमदाबाबमध्ये काल मी खाजगी कामासाठी गेलो होतो. तिथे कुणाचीही भेट झाली नाही. मात्र यापुढे कोणत्याही पक्षात जाणार नाही का ? या प्रश्नावर तसं सांगता येणार नाही असं सांगत आपले पत्ते खुले ठेवले. दिल्लीत राहुल गांधीकडे केलेल्या तक्रारीचं निवारण होईपर्यंत तुम्ही असाच संभ्रम निर्माण करणार का ? या प्रश्नावर तो राहुल गांधीचा प्रश्न आहे असं सांगत प्रश्नाला बगल दिली.

COMMENTS