‘मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय का’ असं विचारणाऱ्या आरजे मलिष्काला महानगरपालिकेनं नोटीस बजावली आहे. मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने एच वॉर्ड कार्यालयाने नियमानुसार नोटीस बजावली आहे. या मुद्द्यावर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत शिवसेना आणि विरोधक आमने- सामने आले. सपा गटनेते रईस शेख यांनी मलिष्काच्याच घरी जाऊन डेंग्युच्या अळ्यांबाबत नोटीस घेण्याच्या मुद्द्यावर घेतला हरकतीचा मुद्दा उपस्थित केला.
मलिष्काला टारगेट केलं जात आहे. लोकशाही मार्गानं कुणी आपलं म्हणणं मांडत असेल तर ते स्विकारायला हवं. व्हिडीओ बनवने हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अशी भूमीका भाजपने मांडली आहे. तर मलिष्काच्या मागे कुणाचा हात आहे? असा सवाल शिवसेनेने केला. मलिष्काला मुंबईची समज आहे का ? हे गाणं मलिष्काला कुणी रचायला लावलं याचा शोध घेतला पाहिजे. हे गाणं तयार करतांना रेल्वे, वाहतूक जे पालिके अंतर्गत येत नाही अश्या विषयावरही गाण्यातून विडंबना केली आहे. मलिष्काचं हे अद्न्यान आहे. असे शिवसेनेने म्हटलं आहे.
COMMENTS