दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतची क्रेझ केवळ भारतातच नाही, तर जगभरात त्याचे फॅन्स आहेत. आता हेच पहा ना, मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक भारताच्या दौऱ्यावर आज येणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान मोदी यांना भेटण्याआधी अभिनेता रजनीकांतला भेटणार आहेत
मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक आजपासून पाच दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. 4 एप्रिलपर्यंत ते भारतात थांबणार आहेत. रजाक यांचं विमान थेट चेन्नईला रवाना होणार आहे. चेन्नईत आधी रजनीकांत यांची भेट घेऊन नंतरच ते मोदींना भेटणार आहेत.
रजाक यांच्या रजनीकांत भेटीमागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे रजाक आणि त्यांची पत्नी रजनीकांतचे जबरदस्त फॅन आहेत. त्यामुळे त्यांना रजनीकांतला भेटायचे आहे. दुसरे कारण म्हणजे यावर्षी मलेशियात निवडणुका होत आहेत. रजाक यांना पुन्हा निवडणुकीला उभे राह्यचे आहे. मलेशियात भारतीय वंशाचे 27 लाख लोक असून हे सर्व मतदार आहेत. म्हणजे मलेशियातील मतदारांच्या एकुण संख्येच्या 7 ते 8 टक्के मतदार हे भारतीय आहेत. रजनीकांत यांची भेट घेऊन हे मतदान आपल्याकडे वळवण्याचा रजाक यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांनी मोदींच्याही आधी रजनीकांत यांची भेट घेण्याचा निर्णय घेतल्याचं सुत्रांनी सांगितलं
आज रजनीकांत यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नजीब रजाक शुक्रवारी दिल्लीत जातील. त्यानंतर शनिवारी मोदींना भेटतील. या भेटीत ते मोदींबरोबर संरक्षण करार करतील.
COMMENTS