ठाण्यामध्ये आज शिवसेनेने महागाईच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई वाढत्या पेट्रोलचे दर ‘अच्छे दिन आएंगे’ च्या विरोधात घोषणाबाजी करत विराट मोर्चा काढला. ठाणे शहरातून ते जिल्हाधीकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला, महागाई विरोधात निषेद म्हणून बॅनरबाजी ,बैलगाडी, तसेच महिलांनी चुलीवर भाकऱ्या थापून महागाईचा निषेद करण्यात आले आहे. या विराट मोर्चेमधे आमदार खासदार सह शिवसेना पधादिकारी मोर्चेमधे सहभागी झाले होते. हा मोर्चा अत्यंत जीवनावश्यक वास्तूमध्ये वाढलेले दर कमी झाले पाहिजे त्यामुळे शिवसेना सरकारमध्ये असली तरी सामान्य जनतेच्या पाठीमागे आहे. त्यामुळे हा महागाई विरोधात विराट मोर्चा आहे. असे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महागाई तसेच दिवसेंदिवस वाढणारे जीवनावश्यक गोष्टींचे भाव याचाच निषेध करण्यासाठी आज ठाण्यात शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मार्गदर्शन खाली जिल्हा शाखा येथून राम मारुती रोड मार्गे मोर्चा बाजारपेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यलय येथे मोर्चाची सांगता होणार आहे. यात सेनेच आमदार खासदार आणि नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी सरकारच्या विरोधात घोषणाबानी करण्यात आली मोर्चा मुळे तसेच टेम्भी नाका येथील नवरात्र उत्सवामुळे एकच वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आदेशाने महागाई विरोधात शिवसेना ठाणे जिल्हा शाखेचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
COMMENTS