कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ची घोषणा दिल्यास पद रद्द करण्याचा इशारा देणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निषेध केला आहे. महाराष्टाचा अपमान केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जावू असा इशारा देत राज्य सरकारने कर्नाटक सरकारसोबतच केंद्र सरकारलाही पत्र लिहिले आहे.
मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्यावरुन कर्नाटकाला पाणी, वीज, आरोग्य सेवा पुरवत असतानाही बेग यांची भाषा खपवून घेतली जाणार नाही, असे ठणकावत फडणवीस सरकारने कर्नाटक सरकारला पत्राव्दारे चांगलाच दम दिला आहे. शिवाय ‘कर्नाटकच्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्राकडून निषेध करण्यात आला आहे. देशात कोणालाही ‘जय महाराष्ट्र’ बोलण्यापासून थांबवता येणार नाही. महाराष्ट्राच्या संविधानाने तो अधिकार दिलेला आहे. त्या संदर्भात कर्नाटक सरकारला निषेध कळवतो आहोत’, असे फडणवीस म्हणाले.
COMMENTS