गेल्या आठवड्यात अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची बातमी आली होती. आता एका केंद्रीय मंत्र्याला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ते सध्या घरी आराम करत आहेत. त्यांच्या खात्याचे राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे हेच संसदेमध्ये मनुष्यबळ विकास खात्याचा किल्ला लढवत आहेत. राज्यासह देशात अनेक ठिकाणी स्वाईन फ्लूची साथ आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण आहे.
COMMENTS