दिल्ली – केंद्र सराकरानं आज पाच राज्यांसाठी राज्यपालांची नेमणूक केली. यामध्ये बिहारसाठी सत्यपाल मलिक यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर नागपुरचे भाजप नेते आणि माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून वर्णी लागलीय. बी डी मिश्रा हे अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असतील. जगदीश मुखी यांची आसामचे राज्यापल म्हणून तर गंदा प्रसाद यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर एडमिरल (निवृत्त) देवेंद्र कुमार जोशी यांची अंदमान आणि निकोबारचे या केंद्रशासीत प्रदेशाचे राज्यपाल असतील.
Older Post
मुख्यमंत्री
COMMENTS