महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना अखेर डीवायएसपी अर्थात पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. चौधरी यांना आठवड्याभरात नौकरी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2016 मध्ये जाहीर केलं होतं.मात्र अनेक दिवस लोटूनही त्यांना नौकरी मिळाली नव्हती .याबाबत त्यांनी राज्यसरकार विरोधात खंत ही व्यक्त केली होती. आता त्यांना नौकरीत सामावून घेण्यात येणार आहे.
जळगावचा विजय चौधरी गेले काही महिन्यापासुन क्रिडा क्षेत्रातून नोकरीसाठी प्रयत्न करत होते. चौधरींना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली असून. अखेर त्यांना नोकरी मिळाली आहे.
COMMENTS