“महालक्ष्मी एक्सप्रेसचं नाव अंबाबाई एक्सप्रेस करा”

“महालक्ष्मी एक्सप्रेसचं नाव अंबाबाई एक्सप्रेस करा”

कोल्हापूर – मुंबई या महालक्ष्मी एक्सप्रेसचं नाव बदलून अंबाबाई एक्सप्रेस करा अशी मागणी कोल्हापुरातील अंबाबाई भक्त, शाहु महाराज प्रेमी आणि शिवसेनेनं केलीय. त्यासाठी काल आंदोलन करण्यात आलं. महालक्ष्मी एक्सप्रेसवर अंबाबाई एक्सप्रेस असं नाव लिहून हे आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरातील आणि अंबाबाई भक्त आणि शाहु महाराजप्रेमी जनतेच्या भावना लक्षात घेऊन तातडीनं नामकराण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भाजप नगरसेवक ठाणेकर यांची दिलगिरी

महालक्ष्मी मंदिरातील श्री पुजक आणि भाजपा नगरसेवक अजित ठाणेकर यांची अखेर दिलगिरी व्यक्त केलीय. महालक्ष्मी देवीच्या बांधलेल्या पुजेमुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल  जनभावनेचा आदर करुन मंदिरापासुन अलिप्त रहात आसल्याच प्रसिद्धीपत्राद्वारे त्यांनी जाहीर केलं आहे. अजित ठाणेकर यांना मंदिरात जान्यापासुन कायमच बंद करावं अशी मागणी अंबाबाई भक्त मंडळान केली होती.

COMMENTS