हैदराबाद – सोशल मीडियावरुन महिलांना अश्लील छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक गौडला अटक केली आहे. अभिषेक गौडला हा ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ या पक्षाच्या हैदराबादमधील नगरसेवकाच्या मुलगा असून मंगळवारी रात्री पोलिसांनी अटक केली.
अभिषेक आणि त्याच्या दोन मित्रांनी फेसबुकद्वारे या महिलांशी संपर्क साधला. यानंतर त्यांचा मोबाईल नंबर मिळवून त्यांच्याशी व्हॉट्स अॅपवर बोलायला सुरुवात केली. गौड आणि त्याचे मित्र पीडित महिलांवर व्हिडीओ कॉलसाठी दबाव टाकत होते. तसेच प्रत्यक्षात भेटण्याचा तगादाही लावला. मात्र, पीडित महिलांनी नकार दिल्यावर गौडने त्यांना धमकी दिली. हैदराबाद पोलिसांकडे दोन महिलांनी अभिषेक गौडविरोधात तक्रार दाखल केली. इंटरनेटवर मॉर्फ केलेले अश्लील फोटो अपलोड करुन बदनामी करु, अशी धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आयटी अॅक्ट, विनयभंग या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS