महिला आयोग अध्यक्षांच्या प्रयत्नाने मुंबईत हरवलेली अल्पवयीन मुलगी दीड तासात सापडली…

महिला आयोग अध्यक्षांच्या प्रयत्नाने मुंबईत हरवलेली अल्पवयीन मुलगी दीड तासात सापडली…

नसीमा खातून ही 15 वर्षांची मुलगी मुंब्य्रात शिकते होती. मुंब्य्रामध्ये नसीमा ही हॉस्टेलला राहते. काही  कारणास्तव हॉस्टेल मधून नाराज झालेली ही मुलगी काल नालासोपारा येथे आपल्या घरी एकटीच निघाली.  मात्र दादर स्थानकात आल्यांनतर गोंधळलेल्या नसीमाला लखनौ मध्ये असलेल्या भावाव्यतिरिक्त कुणीच आठवेना. सहप्रवाशांच्या मदतीने तिने आपल्या भावाला फोन लावला. लखनौ मधून भाऊ इम्तियाज याने थेट संपर्क साधला महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना…. विजया रहाटकर यांनी तातडीने पोलिसांना संपर्क करत याबाबत तपास करण्याची सूचना दिली. ज्या सहप्रवाशाच्या फोन वरून नसीमाने आपल्या भावाला संपर्क केला त्याच्या नंबरचा छडा लावत पोलिसांनी नसीमाला अवघ्या दीड तासात शोधलं.

COMMENTS