मुंबई – शिवसेनेच्या मराठवाड्यातील आमदारांची मातोश्रीवर बैठक सुरू झाली आहे. या बैठकीचा अजेंडा सांगितला जात नसला तरी ही बैठक सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावे की नको याबाबत आमदारांची मते जाणून घेतली जाणार असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. त्यावर आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ नये असा अशी भावना ग्रामिण भागातील विशेषतः मराठवाड्यातील आमदारांनी घेतल्याचं बोललं जातंय. सध्यातरी सरकारमधून बाहेर पडू नये अशी या आमदारांची भूमिका असल्याचं कळतंय. सरकारमधून बाहेर पडलं आणि पुन्हा निवडणूक झाली तर निवडणू येण्याबाबत साशंकता असल्यामुळं हे आमदार सरकारमधून बाहेर पडण्याचा विरोधात असल्याची माहिती कळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत आमदार आपल्या भावना सांगणार आहेत. तर सरकारमध्ये आणखी पुढे राहणं शिवसेनेला अडचणीचं आहे. त्यामुळं पक्षप्रमुख यावर कसा मार्ग काढतात ते पहावं लागेल. त्यामुळे आता या बैठकीकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS