विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आधीच शेतकरी चिंताग्रस्त असताना शेतकरी त्यात आणखी चिंता वाढवणारी बातमी आहे. सध्या सर्वत्र शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. परंतू मान्सून वेग मंदावला असून पाऊस आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे.
मान्सून तामिळनाडू, कर्नाटक, गोवा महाराष्ट्र दिशेने जाण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याने मान्सूनचा वेग मंदावला असून अद्याप केरळ राज्यांतच मान्सून आहे. अरबी समुद्राकडून मान्सूनला गती नसल्याने केरळच्या पुढे मान्सून सरकला नाही. साधारणता आज म्हणजे 5 जूनला मान्सून गोवा, दक्षिण कोकणात महाराष्ट्रात दाखल होण्याची तारीख असते पण अद्याप मान्सून केरळातच आहे. मान्सून प्रगती अद्याप अनुकूल वातावरण नसल्याने महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होईल हे सांगणे तुर्तास कठीण आहे. भारताच्या पुर्वेकडून मात्र मान्सूनला चांगला वेग असून. आसाम येथून पूर्वेकडून मान्सून प्रवास सुरू झाला आहे.
COMMENTS