नवी दिल्ली – एअर इंडियाच्या अधिका-याला मारहाण केल्याच्या प्रकरणी चौफेर टीका होत असताना शिवसेनेनं मात्र खासदार रविंद्र गायकवाड यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकरणात शिवसेना एअर इंडीयाच्या अधिका-याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार करणार आहे. एअर इंडीयाच्या अधिका-यांनी खासदारांच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. खासदार गायवाड यांना अधिका-यांनी चांगली वर्तणूक दिली नाही. बिजनेस क्लासचे तिकीट असातनाही इकाॅनाॅमी क्लास मध्ये बसविले असा आरोपही शिवसेनेनं केलाय. या प्रकरणी खासदार गायकवाड यांनी पक्षाचे नेते खासदार अनिल देसाई यांच्याकडे बाजू मांडल्यानंतर देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर पक्षानं खासदार गायकवाड यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान एअर इंडियानं खासदार गायकवाड यांना एअर इंडियातून प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्यावर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. फेडरेशन आॅफ इंडीयन एअरलाईन्स कोणत्या कायद्याखाली प्रवास रोखणार ? एअर इंडीयाला खासदारांचा प्रवास रोखण्याचा अधिकार नाही असंही पक्षातर्फे सांगण्यात आलंय.
दरम्यान, एअर इंडियाच्या कर्मचा-याला मारहाण प्रकरणावरुन खासदार रविंद्र गायकवाड यांच्यावर आता चौफेर टीका होऊ लागलीय. कोणत्याही लोकप्रतिनिधीने किंवा सामान्य नागरिकाने अशा प्रकारचं कृत्य करणं चुकीचं असल्याचं मत लोकसभेच्या सभापती सुमीत्रा महाजन यांनी व्यक्त केलंय. तर गायकवाड यांच्या कृतीमुळे सर्वच खासदारांची आणि देशाची बदनामी झाल्याची टीका त्यांच्या सहकारी खासदारांनी केली आहे. शिवसेनेच्या खासदारांच्या या कृतीमुळे राजकारण्यांबद्दल जनतेच्या मनात राग निर्माण होत असल्याची टीका काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केलीय.
COMMENTS