महापालिका आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय
सन 2016-17 सालामध्ये विकसित करण्यात येणा-या मिळकतींच्या मालमत्ता कराच्या वाजवी दरामध्ये केलेली वाढ 25 ते 50टक्केपर्यंत कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सन 2016-17 सालामध्ये विकसित होणा-या मिळकतींचे करयोग्य मूल्य ज्या आधारे ठरविण्यात येते त्या वाजवी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली होती. सदरची दरवाढ 1 एप्रिल 2017 पासून अंमलातही आली होती. तथापि वाजवी दरामधील ही वाढ जास्त प्रमाणात असल्याने एमसीएचआय, पत्रकार संघटना तसेच विविध संस्थानी महापालिका आयुक्त श्री. जयस्वाल यांची भेट घेवून सदर दराविषयी फेरविचार करावा अशी विनंती केली होती.
त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी सारासार विचार करून वाजवी दरामध्ये साधारत: 25 ते 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सन 2016-17 या वर्षामध्ये विकसित होणा-या अनेक मिळकत धारकांना होणार आहे.
COMMENTS