मालेगाव निवडणुकी दरम्यान कॉंग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मालेगाव निवडणुकी दरम्यान कॉंग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला  आज सकाळपासून शांततेत सुरुवात झाली होती. मात्र, एटीटी हायस्कूल मतदान केंद्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाले. यात  दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत समर्थकांना पिटाळून लावले. हाणामारीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची नावे इरफान अहमद मो. आबिद, अब्दुल लतीफ अशी असल्याचे समजते.

मालेगावमध्ये आज 21 प्रभागातील 83 जागांसाठी मतदान होत असून 373 उमेदवारांचे भवितव्य इव्हिएम यंत्रांत बंद होणार आहे.

COMMENTS