एकीकडे विज्ञानाने माणूस दिवसेंदिवस प्रगती करत असताना, दुसरीकडे अजुनही काही जण बुसरटलेली विचारसणी सोडायला तयार नाहीत असे चित्र आहे. केरळमधील काँग्रेसच्या एका नेत्याच्या विधानावरुन हे स्पष्ट होतंय. केरळमधील एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम एम हुसेन यांनी असंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं. मासिकपाळी अपवित्र असून या काळात महिलांना मंदिर, मशीद किंवा चर्चमध्ये प्रवेश देऊ नये अशी मुक्ताफळे उधळली. या काळात महिलांचे शररी अशुद्ध असते असंही त्यांनी म्हटलंय. महिला संघटनांनी हसन यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. हसन हे केरळ काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष आहेत. या काळात त्यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांचे हंगामी अध्यक्षदही धोक्यात आलंय. यापूर्वी केरळमध्ये शबरीमला देवस्थानात मासिकपाळी दरम्यान 50 महिलांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. आताही असाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Newer Post
उद्धव ठाकरेंचे `मातोश्री` 2 Older Post
व्हाईट हाऊस संशयित वस्तु आढळल्याने बंद !
COMMENTS